29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeधाराशिवचिंचा फोडून ओमराजेंना केली निवडणुकीसाठी मदत

चिंचा फोडून ओमराजेंना केली निवडणुकीसाठी मदत

धाराशिव : राजकारणात काम करणा-याला लोक डोक्यावर घेतात अन् मतदारांकडे पाठ फिरवणा-याला खाली पाडतात. राज्यात आणि देशात याचा अनुभव अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना कधी ना कधी येतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांना हा अनुभव येत आहे. मराठवाड्यातील लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना एक सुखद अनुभव आला.

लोकांचे प्रेम काय असते, याची प्रचीती देणा-या क्षणामुळे ते भारावून गेले आणि लोकसभा निवडणुकीसाठी चिंच फोडून सोळाशे रुपयांची मदत करणा-या आपल्या बहिणीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचे झाले असे की, मंगरूळ (ता. तुळजापूर) येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्वकष्टाने कमावलेले १६०० रुपये रोख मदत म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आईकडे सुपुर्द केले.

सध्याच्या युगात जिथे राजकारणाचा विचका झालाय आणि बहुतांश राजकारण्यांना लोक शिव्या देतात, अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी दौ-यादरम्यान लोकांचे मिळणारे प्रेम, आपुलकी बघून कृतकृत्य झाल्याची जाणीव होते. अनेक सामान्य नागरिक जे स्वत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, असे लोक स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन माझ्यासाठी आर्थिक मदत घेऊन पुढे येत आहेत. त्यांच्या मदतीची रक्कम ही अनेक करोडो रुपयांना भारी आहे. कारण त्यात त्यांची आपुलकी आहे, अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR