31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रहेमलता पाटील यांचा दीड महिन्यात शिंदे गटाला जय महाराष्ट्र

हेमलता पाटील यांचा दीड महिन्यात शिंदे गटाला जय महाराष्ट्र

नाशिक : प्रतिनिधी
दीड महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणा-या नाशिकच्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून सध्या तरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा हेमलता पाटील यांनी केला.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून हेमलता पाटील इच्छुक होत्या. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. ठाकरेंच्या शिवसेनेने माजी आमदार वसंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यानंतर हेमलता पाटील या नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दीड महिन्यातच त्यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र केला. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR