सोलापूर – हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी 3 जानेवारी 2024 या दिवशी भवानी पेठ, जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त व उद्योजक सत्यनारायण गुर्रम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख . बापू ढगे, अक्कलकोट प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे अध्यक्ष . प्रसाद पंडित, सनातन संस्थेचे . हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे उपस्थित होते.
हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.