परभणी / प्रतिनिधी
शहरातील गंगाखेड रोडवरील उड्डाणपुलाशेजारी राहणा-या एका विवाहीतेस तुला तिन्ही मुलीच झाल्याच्या कारणावरून पतीने पेट्रोल टाकुन जाळले. दरम्यान उपचार सुरू असतांनाच या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीज समोर भाग्यश्री अमर काळे व त्यांची बहिण मैना कुंडलिक काळे या वास्तव्यास आहेत.
कुंडलिक काळे हा तिन्ही मुलीच झाल्याच्या कारणावरून दररोज शिवीगाळ करून मारहाण करीत असे दरम्यान भाग्यश्री काळे या त्यांचे भांडण सोडवित. दरम्यान गुरूवार दि. २६ रोजी रात्री ८ च्या सुमारास कुंडलिक उत्तम काळे हा घरी येवून पत्नी मैना काळे हीच्या अंगावर रॉकेट टाकुन पेटवून दिले. दरम्यान त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाग्यश्री अमर काळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान विवाहीतेला पेटवून दिल्यानंतर घरासह बाजुस असलेल्या चाऊस इलेक्ट्रिशियन आणि रॉयल मोटर्स या दुकानांमधील बरेचसे सामान जळाले आहे.