जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
अर्शदीपसिंगच्या भेदक मा-यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचला आहे. कारण अर्शदीपसारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.
अर्शदीपसिंगचा हा चौथा वनडे सामना होता. पण त्याला यापूर्वी एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण अर्शदीपने ही सर्व कसर यावेळी भरून काढली. कारण अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स मिळवत भारताच्या विजयाचा पाया रचला. आतापर्यंत टी-२० सामन्यात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती. पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी मिळवले आणि इतिहास रचला. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते. पण अर्शदीपने ही किमया आज करून दाखवली. अर्शदीपला यावेळी आवेश खानची चांगली साथ मिळाली.
कारण अवेश खानने चार बळी मिळवत अर्शदीपला चांगली साथ दिली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९ फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या वनडे सामन्यात ११६ धावांवर ऑल आऊट करता आले.