नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला . माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे.
सीतारामन या पुढच्या महिन्यात ६५ वर्षांच्या होतील. २०१९ मध्ये दुस-यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून, सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
आज (दि.२३) त्या सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग ५ अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम त्यांनी मोडला.
भारताची अर्थव्यवस्था सातत्याने चांगली कामगिरी
: निर्मला सीतारामन
सकाळी ११.०३ वाजता त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, भारताची अर्थव्यवस्था सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, आणि भविष्यातही हे चालू राहण्याची अपेक्षा आहे. महागाई सातत्याने नियंत्रणात आहे. खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत.
आम्ही अंतरिम अर्थसंकल्पात म्हटल्याप्रमाणे – गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता – आम्हाला या चार जातींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. एका महिन्यापूर्वी आम्ही जवळपास सर्व प्रमुख पिकांवर एमएसपी वाढवण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ८० कोटींहून अधिक लोकांना लाभ देण्यासाठी चालू आहे.