21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयरहस्यमयी आजारामुळे चिमुकल्यांसाठी ‘होमवर्क झोन’

रहस्यमयी आजारामुळे चिमुकल्यांसाठी ‘होमवर्क झोन’

चीनमधून समोर आली धक्कादायक माहिती सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा

बीजिंग : चीनमध्ये फुफ्फुसासंबंधित एक रहस्यमयी आजार वेगाने पसरत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयांमध्ये लोकांची गर्दी असते. रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या अभ्यासाचे कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी होमवर्क झोन तयार करण्यात आले आहेत. हे चीनच्या उत्तर भागात असलेल्या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हीडीओ व्हायरल होत आहेत. आजारपणातही मुलांना अतिरिक्त ताण दिला जात असल्याचे या उपक्रमाला विरोध करणा-यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला उपक्रम असल्याचे समर्थन करणा-यांचे म्हणणे आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हीडीओमध्ये लहान मुलांना सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे. तरी ते अभ्यास करत आहेत. इतर भागातही हे दिसून येत आहे. ज्यामध्ये मध्य हुबेई प्रांत तसेच पूर्व जिआंगसू आणि अनहुई प्रांतांचा समावेश आहे. दरम्यान भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या अभ्यासानुसार या आजाराचा भारताला धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चीनमध्ये ज्या वेगाने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे. त्यामुळे चिंता नक्कीच वाढली आहे. कारण कोरोनासारखा लहान मुलांचा हा आजार पसरला तर परिस्थिती किती धोकादायक असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. जगातील अनेक देश यासाठी सक्रिय झाले आहेत.

पालकांचा मुलांना पूर्ण पाठिंबा
होमवर्क झोनमध्ये मुलांसाठी टेबल, खुर्च्या आणि ड्रिपची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून उपचारासोबतच त्यांचे शिक्षणही सुरू राहील. या रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, पालक मुलांना पूर्ण पाठिंबा देत आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना एका पालकाने हॉस्पिटलमधील अभ्यासाच्या सकारात्मक वातावरणाबद्दल आनंद व्यक्त केला. माझ्या मुलाला इथे गृहपाठ करू देण्याचा माझा हेतू नव्हता. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये अभ्यासाचे वातावरण पाहिले तेव्हा मला ते चांगले वाटले. म्हणूनच मी माझ्या मुलालाही गृहपाठ करायला सांगितले असे म्हटले आहे.

मुले मानसिकरित्या आजारी
आणखी एका मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्या मुलाने रुग्णालयात त्याचा गृहपाठ पूर्ण केला पाहिजे जेणेकरून तो बरा झाल्यानंतर शाळेत परतल्यावर अभ्यासात मागे पडू नये. मात्र, प्रत्येकजण या उपक्रमाला पाठिंबा देत नाही. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डूयीनवर एका युजरने ही मुले शारीरीक आणि मानसिकरित्या खूप आजारी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR