22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान

सोलापूर – जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सावित्रीच्या लेकी सन्मान सोहळा शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ नेहा रोडा, दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती पांडे, मनोरमा बँकेचे चेअरमन शोभा मोरे, माजी महापौर नलिनी चंदिले, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, नगरसेविका पूनम बनसोडे, माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी शहराध्यक्ष खरटमल यांनी महिलांनी आपले कर्तुत्वन सिद्ध करावे तसेच शरद पवार यांच्यामुळे पहिल्यांदा महिला आरक्षण धोरण महाराष्ट्राने देशाला दिले असे सांगितले. यावेळी दयानंद कॉलेजच्या प्राचार्य कीर्ती पांडे यांनी महिलांनी जिद्दीन काम करावे, वेगवेगळे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात काम करावे असा सल्ला दिला तर डॉ नेहा सिंह रोडा यांनी आरोग्याविषयी महिलांचे समोर विचार मांडले तसेच मनोरमा बँकेचे चेअरमन शोभा मोरे यांनी महिलांना आर्थिक पद्धतीने काटकसरीने बचत गटाच्या माध्यमातून योग्य ते सूचना योग्य ते धोरण राखण्याबाबत सांगितले.

यावेळी सर्व उपस्थित महिलांचे फेटा शाल व पुष्पहार देऊन शहराध्यक्ष सुधीर खरटमल व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गौरा कोरे, रेखा सपाटे, मनीषा माने, नसीमा शेखसंधी, सुनिता गायकवाड, शारदा शिंदे, राजश्री कोडमुर, रुक्मिणी नागणे, सुमज इंगले, संगीता कोकणे, संगीता इंगळे, संध्या लोखंडे, सुलोचना बनसोडे, सुमित्रा बिरुणगी, कविता औरसग, लक्ष्मीबाई पेंगड्याल, गीता बासकी, सारिका नारायणकर, कल्पना जाधव, वैशाली चव्हाण, अनुसया दहीहंडी, प्रमिला बिराजदार, राजनंदनी चुंगे, सुनिता दळवी, इंदुमती भोसले, राणी पवार, शशिकला गायकवाड, माधुरी गायकवाड, अनिता धनवले, शितल बगले, पुष्पा कांबळे, श्रीदेवी चाबुकस्वार, वसीम खान, लाडजी नदाफ, सुरेश कुंभार, प्रा. राहुल बोळकोटे, सुनील इंगळे, सूर्यकांत शेरखाने, अजमल शेख, शक्ती कटकदौंड, द्वारकाप्रसाद तावनिया, ज्ञानेश्वर सोनवणे, मोईन नदाफ, अनिस शेख, मल्हार शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR