मेहकर(बुलडाणा) : नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ. मंगला सुरेश मानवतकर यांचा दणदणीत विजय झाला.
दरम्यान सिने अभिनेते व जय साई नटराज चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्ष विजय मानवतकर व त्यांच्या सोबत सौ. सुलोचना विजय दुतोंडे जिल्हा (अध्यक्ष लहुजी सेना महिला आघाडी) व त्यांचे पती विजय दुतोंडे यांनी येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे सौ. मंगला सुरेश मानवतकर ह्या प्रभाग क्रमांक ०३ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांनी सौ. मंगला मानवतकर यांचे चिरंजीव काँग्रेसचे माजी नगरसेवक निलेश मानवतकर यांना संविधानाची प्रत देऊन सन्मान केला.

