सोलापूर – काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान काँग्रेस भवनर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन इ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यकर्त्यांचा गांधी टोपी, तिरंगा शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी संयोजक शटगार यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रसिद्ध प्रमुख सातलिंग शटगार यांनी केले.
चंद्रकांत जंगले, मल्लिकार्जुन काटगाव, हिराबाई राठोड अक्कलकोट, बसण्णा सायबण्णा लोहार (अक्कलकोट), मोतीराम चव्हाण, अशोकराव देवकते, अशोक कस्तुरे, इफ्तेकार कुडले, कल्याणी कोकरे (दक्षिण सोलापूर), कृष्णदेव वाघमोडे, दत्तात्रय सावंत, सिद्राम पवार, राजेंद्र सर्जे, सुनील टिळेकर, बिरासाहेब खरात (मोहोळ), मुबारक शेख (मंगळवेढा), ज्ञानेश्वर फलटणकर, श्रीपाद द. बडवे (पंढरपूर), रमजान पठाण, गोविंदराव पंके (बार्शी), बाळासाहेब मगर (माळशिरस), अंबादास गुत्तीकोंडा, पुरुषोत्तम बलदवा, चंद्रकांत आव्हाड, हाजी मेहमूद शेख, जब्बार शेख, हनुमंत रुपनर, महिबूब शेख, इब्राहिम कलबुर्गी, मोहसीन फुलारी.या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.