वाघोली : कोणार्क ऑर्किड सोसायटीतील १२ व्या मजल्यावरील एका सदनिकेला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सदनिकेतील संपूर्ण फर्निचर व अन्य वस्तू जाळून खाक झाले. यावेळी सदनिकाधारक बाहेर खरेदीला गेले होते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
११ च्या सुमारास त्या सदनिकेतून धुराचे लोट बाहेर येवू लागले. ही बाब अन्य सदनिका धारकांनी पाहिल्यावर त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन अग्निशामक दलाच्या वाहनांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
दरम्यान त्या इमारतीतील वीज पुरवठा स्थगित करण्यात आला. सदनिकेत दोन सिंिलडर होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी ते प्रथम सुरक्षित पणे बाहेर काढले. मात्र आगीत संपूर्ण फर्निचर व इतर वस्तू जाळून खाक झाल्या. सुधींद्र बाबू मलायानुर यांच्या मालकीची ही सदनिका आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
.