नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचा पक्ष इस्राईल -हमास युद्धावरील नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावावर मतदानादरम्यान भारताच्या गैरहजेरीला “तीव्र विरोध” करतो. त्या म्हणाल्या की, काँग्रेसने हमासच्या हल्ल्यांचा निःसंदिग्धपणे निषेध केला आहे. पण इस्राईल त्या लोकांशी बदल घेत आहे, जे मोठ्या प्रमाणात असहाय आहेत. ही शोकांतिका आणखी वाढली आहे, तेही निर्दोष आहेत. ‘मानवता आता कसोटीच्या काळातून जात आहे’, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांनी असेही म्हटले आहे की, इस्राईलसोबत सहअस्तित्वात सार्वभौम, स्वतंत्र आणि सुरक्षित पॅलेस्टिनी राज्यासाठी थेट वाटाघाटी झाल्या पाहिजेत, अशी त्यांच्या पक्षाची दीर्घकालीन भूमिका आहे. पण इस्राईल असहाय लोकांशी बदला घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. इस्राईलवर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हमासच्या हल्ल्यांचा निर्विवादपणे निषेध केला. इस्रायली सैन्याच्या गाझा आणि आसपासच्या “अंदाधुंद कारवाया” मुळे ही शोकांतिका वाढली आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने निष्पाप मुले, महिला आणि पुरुषांसह हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
हिंसेला स्थान नाही
सोनिया गांधी म्हणाल्या की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्राईलवर क्रूर हल्ला केला, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आणि २०० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले. ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यापैकी बहुतांश नागरिक आहेत. ‘हा अनपेक्षित हल्ला इस्राईलसाठी विनाशकारी होता. सुसंस्कृत जगात हिंसेला स्थान नाही असा काँग्रेसचा ठाम विश्वास आहे.
क्रूर प्रतिसादामुळे दुःखी
सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘इस्राईलवर झालेल्या क्रूर हल्ल्याने आम्ही सामूहिकरित्या दु:खी झालो आहोत. आता आम्ही सर्व इस्राईलच्या असमान आणि तितक्याच क्रूर प्रतिसादामुळे दुःखी आहोत. आपला सामूहिक विवेक जागृत होण्याआधी अजून किती जीव गमवावे लागतील? असा सवालही त्यांनी केला.