24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर‘साईंनंदनवनम’मध्ये हुरडा पार्टी

‘साईंनंदनवनम’मध्ये हुरडा पार्टी

चाकूर : प्रतिनिधी
जे जे नवं ते ते हवं या संकल्पनेतून चाकुरच्सा सुप्रसिध्द साईनंदनवनममध्ये टेंट कैंपंिनग आणि हूरडा पार्टीची सुरूवात होत असल्याची माहिती साईनंदनवनचे संचालक विशाल उत्तमराव जाधव यांनी दिली. शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, साधारणत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हुरडा पार्टीचे प्रमाण पाहायला मिळते. कोवळी ज्वारीची कणसे खास हूर्ड्यासाठी निवडली जातात. साधारणत: डिसेंबर महिना सुरू झाला की हुरडा पार्टीला सूरूवात होते. ते थेट फेब्रुवारी महिन्यापर्यंत हूर्डा पार्टीसाठी योग्य काळखंड असतो. या अनुषंगाने वृन्दावंन कृषी पर्यटन चाकूर येथे ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. गरम हा हुरडा आपल्या समोर आल्यानंतर त्याला खाण्याचा मोह आवरत नाही. त्यासोबत चवीने खायला गूळ, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, असे विविध प्रकार घेतले जातात. यासोबतच रानातील चुलीवर केलेली भाकरी आणि भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.

दरवर्षी अनेकांचे वृन्दावंन हुरडा पार्टीला जाऊन जेवणाचे बेत ठरतात. या पार्टीत दिवसभराचा पॅकेज उपलब्ध असतो. सकाळी उसाचा ताजा रस त्यांनंतर नाश्त्याला पोहा, चिवडा, पेरू, व अन्य फ्रुट दिले जातात. त्यांनंतर हुरडा कणीस भाजून त्यासोबत विविध चटण्या , मठ्ठा , भाजलेले वांगे, कांदा असे दिले जाते. नंतर दुपारी जेवणात पिटले, वरण, वांग्याची काळ्या मसाल्यातील भाजी, गव्हाची खीर, कडक बाजरी व ज्वारीची भाकरी पापड, भात दही ठेचा असा मेनू दिला जातो. बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व इतर बरेच खेळणी आहेत. संध्याकाळी चहा सोबत कांदाभजी देऊन एकदिवसीय हुरडा पार्टीचा समारोप होतो.

यावर्षी प्रत्येक शनिवारी व रविवार पुणे पवना डैम सारखी सम्पूर्ण सुविधा असलेली तलावाच्या कड़ेला टेंट कैंपंिनगची सुरुवात करण्यात आली आहे जिथे निसर्गप्रेमी येऊन निसर्गामध्ये व रात्रच्यिा उघड़या आकाशाचा आनंद घेत जेवण, स्रैक्स, म्यूजिक, बोंिटग, सह टेंट कैंपेंिनगचा आनंद अगदी माफक दरात उपलब्ध केले गेले आहे. विविध ग्रुप, महिला ग्रुप, डॉक्टर्स, गेटटूगेदर, अनिवर्सरी सोहळा साजरा करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे, यासोबतच वॉटर पार्क, नविन इंटरनेशनल राईडसह अमूजमेन्ट पार्क, एडवेंचर पार्क अशा अनेक मनोरंजन सुविधांसह शिवालय मंदिरचे दर्शनही होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR