31.6 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeराष्ट्रीयअल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांचा समन्स

अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांचा समन्स

चेंगराचेंगरी प्रकरणी होणार चौकशी

हैदराबाद : पुष्­पा २ फेम अभिनेता अल्­लू अर्जुनच्या अडचणी काही कमी होत नसल्­याचे दिसून येत आहे. पुष्­पा २ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्­यान संध्या थिएटरमध्ये झालेल्­या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून सुपरस्­टार अल्­लु अर्जुन विवादात सापडला आहे. आता अल्­लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थेएटर चेंगराचेंगरी प्रकरणी मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी चौकशीसाठी समन्स जारी केले होते.

पुष्­पा २ च्या प्रीमियरच्या दरम्­यान झालेल्­या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला होता. तर तीचा मुलगाही गंभीर जखमी झाला होता. या ८ वर्षीय मुलाला डॉक्­टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. त्­या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी अल्­लु अर्जुनला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली होती.

दाक्षिणात्­य अभिनेता अल्­लू अर्जुनच्­या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्­यात घेतले आहे. दरम्­यान, तोडफोडीच्­या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता. या प्रकरणी अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांकडून आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा असल्­याचे जुबली हिल्स पोलिसांनी स्­पष्­ट केले आहे.

उस्मानिया विद्यापीठातील पदाधिका-यांनी अल्­लू अर्जुन नेत्यांनी अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्­यांनी संध्या थिएटरमध्­ये झालेल्­या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी तत्­काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) आठ सदस्यांना अटक केली. त्­यांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. दरम्­यान अल्­लू अर्जुनच्­या घरात तोडफोडीचा व्हीडीओ सोशल मीडिया व्­यहायल झाला आहे. यामध्­ये काही जण घराच्­या कंपाऊंडमधील कुंड्या फोडल्­याचे दिसत आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR