हैदराबाद : आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुस-या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि इशान शर्माने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. पॉवर प्लेच्या सहा षटकांत १ गडी बाद ९४ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची पिसे काढली. ३१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या.
तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर हेटमायरने त्याला झेल पकडला आणि तंबूत पाठवले. हेडची विकेट पडल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला. पण त्यानंतर इशान किशन आणि नितीश राणाने तशीच आक्रमकता ठेवली. इशान किशनने आक्रमकता दाखवत २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळी दरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. सनरायझर्स हैदराबादला नितीश कुमार रेड्डीच्या रुपाने तिसरा धक्का बसला. त्याने १५ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यान चार चौकार आणि एक षटकार मारला. हेनरीक क्लासेन आणि इशान किशनने त्यानंतर धावांची गाडी पुढे नेली. क्लासेन आणि इशांत यांच्यात ५६ धावांची भागीदारी झाली. क्लासेने १४ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला.
इशान किशनने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. इशान किशनने ४५ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १०० धावा केल्या. यासह स्पर्धेतील पहिले शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीमुळे या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्येपर्यंत सनरायझर्स हैदराबादने मजल मारली. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमवून २८६ धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी २८७ धावांचे आव्हान दिले आहे. इशान किशनने नाबाद १०६ धावांची खेळी केली.