28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeक्रीडा‘हैदराबाद’चा विजयी ‘अभिषेक’

‘हैदराबाद’चा विजयी ‘अभिषेक’

पंजाबचा ८ गड्यांनी मोठा पराभव सलग पराभवाच्या मालिकेचा केला अंत चेंडू ५५, षटकार १०, चौकार १४ धावा १४१

हैदराबाद : अभिषेक शर्मा याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवला. हैदराबादने विक्रमी २४६ धावांचा यशस्वी पाठलाग करत या मोसमातील सलग ४ पराभवानंतर पहिला आणि एकूण दुसरा विजय नोंदवला असल्याने जणु काही हैदराबादने आता विजयी ‘अभिषेक’करीत पुन्हा विजयी सुरूवात केल्याचे दिसून आले.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग पूर्ण केला. शनिवारी झालेल्या दुस-या सामन्यात, संघाने पंजाब किंग्जविरुद्धचे २४६ धावांचे लक्ष्य केवळ १८.३ षटकांत पूर्ण केले. अभिषेक व्यतिरिक्त ओपनर ट्रेव्हिस हेड यानेही या विजयात बॅटिंगने योगदान दिले. हेडने ६६ धावांची खेळी केली. हेड-शर्माने १७१ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर हेड आऊट झाला. हेडने ३७ बॉलमध्ये ३ सिक्स आणि ९ फोरसह ६६ रन्स केल्या. त्यानंतर दुस-या बाजूने अभिषेकने फटकेबाजी सुरुच ठेवली. अभिषेकने शतकानंतर गिअर बदलला आणि तोडफोड बॅटिंग केली.

अभिषेकला नाबाद परतण्याची संधी होती. मात्र हैदराबाद विजयाच्या उंबरठ्यावर असताना अभिषेक आऊट झाला. अभिषेकने ५५ चेंडूत १० षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १४१ धावांची विक्रमी खेळी केली. तर त्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि ईशान किशन या जोडीने हैदराबादला विजयी केले. क्लासेनने १४ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. तर ईशान किशनने ६ बॉलमध्ये नॉट आऊट ९ रन्स केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.

अभिषेक शर्माचे झंझावाती शतक
हैदराबादच्या घरच्या मैदानात अभिषेक शर्माने आयपीएलमधील पहिली सेंच्युरी झळकावली असून आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी साकारली. यंदाच्या हंगामातील हे तिसरे शतक आहे. याआधी याच संघाकडून खेळणा-या इशान किशनने शतक झळकावले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR