भारतात राहण्याची मला लाज वाटते

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनांनंतर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी अशा देशात राहण्याची लाज वाटते असे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही लोकांनी दगड आणि अंडी फेकली, तसेच त्यांना शिवीगाळही केली होती. या घटनेच्या दुस-याच दिवशी हुगळी जिल्ह्यात पक्षाचे दुसरे खासदार कल्याण बॅनर्जी यांना एका पोलिस ठाण्यासमोर कथितपणे धक्काबुक्की करण्यात आली होती.

कपिल सिब्बल काय म्हणाले?
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले हे अत्यंत लाजीरवाणे आहे. मला अशा देशात राहण्याची लाज वाटते जिथे अशा घटना घडतात, जिथे सत्तेत असलेला राजकीय पक्ष आपल्या महान नेत्यांनी प्रजासत्ताक स्थापनेच्या वेळी रचलेला लोकशाहीचा पाया नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.

भाजपचा सिब्बल यांच्यावर पलटवार
सत्ताधारी पक्षावर टीका केल्याबद्दल भाजपने सोमवारी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपने त्यांच्यावर भारतद्वेषी असल्याचा आरोप केला आणि २०२१ मधील पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसेवर ते गप्प का राहिले, असा सवाल केला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करून सिब्बल यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि तरीही त्यांना भारतात राहण्याची लाज वाटते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news