22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार

मी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार

निलेश सांबरे यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

कल्याण : केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिस-यांदा भाजपचे उमेदवार आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या लोकसभेसाठी कोण उमेदवार असेल याबाबत सस्पेंस आहे.

काँग्रेसकडून दयानंद चोरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश म्हात्रे उमेदवारीसाठी दावा करत आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्या दावा करत मी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणत  खळबळ माजलवी. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे निलेश सांबरे यांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीबाबत निर्णय वरिष्ठ नेते घेतील, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मी कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतक-याचा मुलगा म्हणून काम करत आहे. माझे काम शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आहे. मी हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

निलेश सांबरे कल्याणमध्ये आयोजित इफ्तार पार्टीमध्ये रविवारी संध्याकाळी आले होते. सामाजिक कार्यकर्ते समीर खान यांच्या वतीने इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR