23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही

मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येतेय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी मी काँग्रेसचा हिरो मी कुठेही जाणार नाही, माझ्यामागे ईडी लावता येणार नाही, असं म्हणत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर थेट स्पष्टीकरण दिले आहे. तसंच, चव्हाणांच्या राजीनाम्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण साहेब काय बोलतील हे पाहावं लागेल पण चव्हाण घराणं हे काँग्रेसचे मोठे घराणे आहे असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनाच तिकिट मिळणार नाही आधी त्यांच तिकीट कन्फर्म होऊ द्या मग त्यांच्या पक्षात कोण येणार आहे हे सांगा म्हणावं, असा टोलाही धंगेकर यांनी लगावला आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी धक्का मानला जातोय. येत्या काही दिवसांत काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR