मुंबई : प्रसादाच्या लाडूत चरबी आढळून आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिरुपती देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या वादावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांनी एका वाक्यात मला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि अत्यंत निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकर यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर आंध्र प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मिलिंद नार्वेकर यांची टीटीडी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. आंध्र प्रदेश सरकारने टीटीडीमध्ये २४ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.