24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?

मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या गूढ मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंकडून सातत्याने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असे काही करेल असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मानलेल्या आभारावरून शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी कधीच दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR