22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमी सगळ्यांना तुरुंगात घालेन, पूजा खेडकर यांच्या आईची पुणे पोलिसांना दमदाटी

मी सगळ्यांना तुरुंगात घालेन, पूजा खेडकर यांच्या आईची पुणे पोलिसांना दमदाटी

पुणे : पूजा खेडकर यांची २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले, स्वतःच्या खाजगी गाडीवर लाल दिवा मिरवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिले. मात्र तरीही वर्तणुकीत बदल झाला नाही. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहीत तक्रार केली. आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्यांच्या पुण्यातील घरी गेले होते. मात्र पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना घरात येऊ दिले नाही. बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावलं असून आईने मी सगळ्यांना आतमध्ये घालेन असे म्हणत पोलिसांनाच दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR