जळगाव : गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्र म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
जामनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार करणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. एकनाथ खडसे म्हणाले, मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहे. अनेक वेळा जामनेर तालुक्यात माझ्या सभा झालेल्या असून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
ब-याच वर्षांनंतर या ठिकाणी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. त्यामुळे या सभेविषयी उत्सुकता आहे की कोण काय बोलणार…आज दिलीप खोडप यांच्यासह अनेक जण प्रवेश करणार आहेत. मंत्री सतीश पाटील म्हणाले, मागील काळात आमचे लोक फोडले होते. आता आम्ही त्यांचा माणूस फोडला आहे. राज्याचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्यावर आता संकट आहे. खडसे यांना सोबत घेऊन काम करणार आहेत. चार दिवस पूर्वी गिरीश महाजन यांना तांड्यावर बोलावले होते,या ठिकाणी गिरीश महाजन यांना हाकलून लावले होते. त्या गावातील कार्यकर्तांचा अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तीस वर्षात यांना तांड्यावर रस्ते करता आले नाही.
पुढे बोलताना सतीश पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव या चार जागा भाजपाच्या येणार नाहीत. राज्यात त्यांच्या ४६ जागा येऊ शकतात. शिंदे गटाच्या ही जागा जाणार आहे. हे टपरीवाले असल्याचे सांगतात, त्यांच्या कडे किती पैसा आहे हे सांगता येत नाही, कुंभ मेळाव्यात यांनी पैसे यांनी वाटून खाल्ले. युतीचे सरकार घालायचे आहे, महा विकास आघाडीचा आवाज आता वाढत आहे. पवार साहेब ज्या ठिकाणी जात आहेत. त्या ठिकाणी वातावरण बदलत आहेत.