22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाकोहलीला चौथ्यांदा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर पुरस्कार’

कोहलीला चौथ्यांदा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर पुरस्कार’

नवी दिल्ली : भारताचा रन मशिन विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयरचा सलग चौथ्यांदा पुरस्कार पटकावला. आयसीसीने नुकतेच २०२३ चा ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कारावर विराट कोहलीने आपली मोहर उमटवली आहे.

विराट कोहलीसाठी २०२३ वर्ष हे अत्यंत चांगलं गेलं आहे. त्याने मायदेशात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रेकॉर्ड ब्रेक धावा केल्या. त्याच्या बॅंिटगमुळे भारताचा फायनलपर्यंतचा मार्ग सुकर झाला होता. विराट कोहलीने २०२३ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये २७ सामन्यात १३७७ धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने १२ झेल आणि १विकेट देखील घेतली.

विराट कोहलीने तब्बल चौथ्यांदा आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. यापूर्वी विराट कोहलीने २०१२, २०१७ आणि २०१८ मध्ये आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावल होता.
विराट कोहली हा चारवेळा पुरस्कार पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सला देखील मागं टाकलं आहे. डिव्हिलियर्सने तीनवेळा हा पुरस्कार पटकावला होता. विराट कोहलीने मोठ्या बॅडपॅचनंतर२०२२ मध्ये जोरदार कमबॅक केलं होतं. त्यानंतर तो आपल्या जुन्या अवतारात परतला अन् त्यानं वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR