22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडापाकिस्तानपुढे आयसीसीची शरणागती

पाकिस्तानपुढे आयसीसीची शरणागती

भारताची होणार कोंडी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना चॅम्पियन ट्रॉफीसाठी खलबतं सुरू झाली आहेत. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. पण या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी भारतीय संघाची कोंडी होताना दिसत आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धा संपण्यापूर्वीच आयसीसीची चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २०२४ वर्ष संपण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून बहुप्रतीक्षित चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या तात्पुरत्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. रिपोर्टनुसार, चॅम्पियन ट्रॉफी पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानातच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाची कोंडी होताना दिसत आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही असा प्रश्न आतापासून उपस्थित होत आहे. तात्पुरत्या तारखा समोर आल्या असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन स्टेडियम निवडले आहेत. लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे ही चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे. भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये आयोजित करणार असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचे सर्व सामने एकाच स्टेडियमवर आयोजित कण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भारतीय संघाला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येईल. पीसीबीने भारतीय खेळाडूंना सर्व प्रकारची सुरक्षा पुरवली जाईल असे आयसीसीला सांगितले आहे. लाहोर शहर भारतीय सीमेजवळ आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा प्रवासही सोयिस्कर होईल. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात यावा यासाठी पाकिस्तानने सर्वच स्तरांवर तयारी सुरू केली आहे.

भारतीय संघ २००६ पासून पाकिस्तानात गेलेला नाही. पण चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानातच होणार असल्याने भारताची कोंडी झाली आहे. कारण स्पर्धा इतरत्र हलवण्यासाठी आयसीसीकडे ठोस कारण असणे गरजेचे आहे. बीसीसीआय सुरक्षेचे कारण देत असली तर इतर क्रिकेट मंडळांनी त्याची री ओढणे गरजेचे आहे. अलीकडे बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, न्यूझिलंड या संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. दुसरीकडे हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा आयोजित केल्यास पाकिस्तानला फटका बसू शकतो. कारण भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करावे लागतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR