17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा उमेदवार ओळखा; झळकले बॅनर

मराठा उमेदवार ओळखा; झळकले बॅनर

राजकीय वातावरण तापले

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघात मतदानाला एक दिवस उरला असताना कसब्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे पोस्टर झळकले आहेत. ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा’च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे पोस्टर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणा-या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदारराजा आपले मत मतपेटीत बंद करणार आहे. मात्र मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतानाच पुण्यातील हाय व्होल्टेज असणा-या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काल रात्री मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर भाजपकडून हेमंत रासने मनसेचे गणेश भोकरे आणि काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे हे उमेदवार रिंगणात आहेत. मोठी चुरचशी लढाई असणा-या कसब्यात काल मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे पोस्टर झळकले आहेत. ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा’च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे पोस्टर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणा-या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR