24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्यादोन मुलांपेक्षा जास्त मुले असल्यास सवलती बंद?

दोन मुलांपेक्षा जास्त मुले असल्यास सवलती बंद?

नवी दिल्ली : दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा त्याला लाभ दिला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना देऊन केली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एप्रिल, मे महिन्यात होत आहे. यामुळे यंदा अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पात योजना आणि सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली. यावेळी जनतेकडून अनेक सूचना आल्या आहेत. त्यात महत्वाची सूचना म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सर्वच सवलती रद्द करण्याची आहे.

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा त्याला लाभ दिला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी. त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी. तसेच त्याला सरकारचा कोणताही पुरस्कार दिला जाऊ नये. वाहनांच्या स्क्रॅप पॉलिसीसंदर्भात सूचना आली आहे. वाहने १५ वर्षांऐवजी २० वर्षांनी स्क्रॅप करण्याची सूचना करण्यात आली.

गृहकर्जावर देण्यात येणारी करातील सूट दोन लाखांवरुन पाच लाख करण्यात यावी. हाऊसिंग प्रोजेक्टसाठी सिंगल विंडो प्रणाली आणली गेली पाहिजे. निवृत्तीनंतर कॉन्ट्रॅक्टवर सरकारी नोकरी करणा-यांना पेन्शन दिले जाऊ नये, अशी एक सूचना आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची किंमत कमी करण्याची मागणी काही जणांनी केली. वरिष्ठ नागरिकांना रेल्वेतील सवलत पुन्हा सुरु करा, वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना करा, तत्काल तिकीट कन्फर्म मिळायला हवे, मुंबई, कोलकोता, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद शहरात हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR