16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवभावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळे देऊन टाकले असते

भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळे देऊन टाकले असते

धाराशिव : प्रतिनिधी
सुप्रिया सुळे यांनी आज धाराशिवमध्ये आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकले असते’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केल. भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळे देऊन टाकले असते. सरकारचे कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही १५०० रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, १५०० रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता , अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या, माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते. असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.

‘खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे’
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर घरी येऊन पैसे देईन. मतदान आणि स्कीमचा काहीही संबंध नाही. भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयांची किंमत लावली आहे. मी भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळे देऊन टाकले असते. वर जाताना काय घेऊन जाणार? ‘खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बहिणीला ओवाळणी देणार. अहो देवेंद्रजी तुम्ही स्वत:च्या खिशातून पैसे देताय का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. जीएसटी घेता, टॅक्स घेता, खत, तांदुळ, हॉटेलमध्ये जेवले तरी टॅक्स घेता, खिश्यातून घेता का?, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR