27.5 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रई केवायसी नसल्याने निराधार महिलांचे अनुदान बंद होणार?

ई केवायसी नसल्याने निराधार महिलांचे अनुदान बंद होणार?

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना जनतेसाठी राबवल्या जातात. यासाठी फक्त आधार कार्ड वापरले जाते. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त ई केवायसीची अट सरकारची असते. पण आता ही अट पूर्ण न करणा-या हजारो महिलांच्या अनुदानाला कात्री लागणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यी महिलांनी आपले आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबरशी लिंक न केल्याने त्यांचे अनुदान बंद होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबाईल नंबरला लिंक करणे सक्तीचे आहे. तसाच नियम संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी असून आधार कार्डला बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. तर केवायसी पूर्ण केली नसल्याने राज्यातील हजारो महिलांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात ९० टक्के लाभार्थ्यी महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे. पण ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे अनुदान बंद होणार आहे. पण अद्याप वेळ गेलेली नसून मार्चपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

निराधार महिलांना मासिक मदत ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देण्यात येते. यासाठी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजना सुरू केलेली आहे. पात्र निराधार महिलेला प्रतिमाह ६०० रूपयांची आर्थिक मदत सरकार करते. पण आता याच मदतीसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मार्चपर्यंत याची मुदत असून ज्या महिलांनी केवायसी केली नाही. त्यांची मदत बंद होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR