26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमाझ्या जन्मदात्या आईबद्दल काही बोलाल तर याद राखा

माझ्या जन्मदात्या आईबद्दल काही बोलाल तर याद राखा

धनंजय मुंडे भयंकर संतापले

बीड : आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते की, त्यामुळे त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज असेल, त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत, त्या अजून आल्या नाहीत असे सुरेश धस यांनी म्हटले होते. दरम्यान धस यांच्या या विधानानंतर आता धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत सुरेश धस यांना इशारा दिला आहे.

परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत, तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले.

माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केल्या गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.

परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे.

राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळे मी सहन केले. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR