जयपूर : वृत्तसंस्था
सद्य:स्थितीत सरकारच्या विरोधात बोलायची सोय नाही. कारण तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात की तुम्ही देशद्रोही ठरता, असे परखड मत अभिनेते अमोल पालेकर यांनी जयपूर साहित्य महोत्सवात व्यक्त केले.
अमोल पालेकर यांच्या ‘द व् ूफायंडर’ या आत्मचरित्रात्मक इंग्रजी पुस्तकाविषयी संजय रॉय यांनी अमोल पालेकर व संध्या गोखले यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केली, त्यादरम्यान शासनाने पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी पुलंनी हा पुरस्कार स्वीकारताना ‘जे लोक लोकशाही तंत्राने निवडून आले, ते ठोकशाहीचा वापर करत आहेत, अशी प्रखर टीका केली होती. परंतु आता तर अशी परस्थिती आहे की, सरकार अशा प्रकारची कोणतीच टीका खपवून घेत नाही. उलट टीका करणा-यांना देशद्रोही ठरवले जाते.
यावेळी संवादात त्यांनी अभिनेता म्हणनू आपला प्रवास उलगडला. मला चित्रकार व्हायचे होते. परंतु अपघाताने मी अभिनेता झालो. सुरुवातीच्या काळात बी. आर. चोपडा यांच्यासोबत काम करताना त्यांच्याशी आपल्या हक्काच्या ४० हजारांसाठी केलेल्या न्यायालयीन लढाईचा किस्सा सांगितला.