परभणी : अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या लोकांच्या गाड्या काय फोडता. गाड्याच फोडायच्या झाल्यास जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे वादग्रस्त विधान गंगाखेड येथील सभेला संबोधीत करत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. आंबेडकर कालपासून परभणी जिल्ह्याच्या विविध भागात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने सभा घेत आहेत. गंगाखेड येथे शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी ऍड. आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी वरील विधान केले.