33.3 C
Latur
Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रकबर उखडून टाकायची असेल तर टाका, मुस्लिमांना देशद्रोही कशाला ठरवता?

कबर उखडून टाकायची असेल तर टाका, मुस्लिमांना देशद्रोही कशाला ठरवता?

अनिस अहमद यांचा सवाल

मुंबई : नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हेच दोषी आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुराणाची आयात (ओवी) असलेली हिरवी चादर जाळली. लाथ मारून अपमान केल्याने मुस्लिमांच्या भावना भडकल्या असा आरोप करत आणि ज्यांनी दगडफेक करून जाळपोळ केली त्यांचा निषेध नोंदवत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी ही घटना पूर्वनियोजित होती, यास स्पष्ट शब्दात नकार दिला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित होती असे सांगितले आहे.

तर दुसरीकडे ही दंगल जवळून हातळणारे नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी रवींद्र सिंघल यांनी ही घटना पूर्वनियोजित नव्हती असे स्पष्ट केले आहे. दोघांच्या परस्पर विरोधी वक्तव्यावर मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री अनिस अहमद यांनी औरंगजेबाच्या कबरीशी आमचा काही संबंध नाही, ती कबर उखडून टाकायची असेल तर उखडून टाका, मात्र मुस्लिमांना देशद्रोही ठरवू नका, अशी विनंती केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद, डॉ. मो. अवेस हसन, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, हाजी मोहम्मद ताहीर रजा आदींच्या पुढाकारात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वांनीच ज्यांनी अशा पद्धतीचे कृत्य केले, लोकांना भडकवले, प्रवृत्त केले त्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. ज्या असमाजिक तत्त्वांनी हिंसाचार केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी मात्र केवळ धर्म बघून कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

अनिस अहमद, म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवरून सुमारे दोन महिन्यांपासून वाद सुरू आहे. मात्र यास एकही मुस्लिमाने विरोध दर्शवला नाही. प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांसाठी सर्वाधिक पवित्र समजली जाणारी कुराणाचे आयात लिहली असलेली हिरवी चादर जाळून त्यांना उद्युक्त करण्यात आले. औरंगजेबची कबर खोदायची आहे तर खोदून टाका आम्हाला त्याचे काही देणेघेणे नाही.

तसेच बिहारमध्ये निवडणुका असल्याने अशा पद्धतीने पोलरायझेशन केले जात असल्याची शंका अनिस अहमद यांनी व्यक्त केली. बजरंग दलाला कार्यकर्त्यांना अवघ्या काही तसाच सोडण्यात आले. मात्र काही संबंध नसताना अनेक मुस्लिम समाजाच्या व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात काही डॉक्टर, वकील व व्यावसायिकांचा समावेश असल्याचे अहमद यांनी सांगितले. हे सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणे झाले असून या संदर्भात आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे अहमद यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR