36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीरेल्वे प्लॅटफॉर्मवरील जिवघेण्या खड्ड्याकडे अधिका-यांचे दुर्लक्ष

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील जिवघेण्या खड्ड्याकडे अधिका-यांचे दुर्लक्ष

पूर्णा : येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर संगमरवरी फरशी फुटून भला मोठा खोल खड्डा पडला आहे. येथून रेल्वेने दररोज प्रवास करणारे शेकडो प्रवाशी लक्षात घेता रेल्वेत चढता, उतरताना हा खड्डा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरू शकतो. येथील कंत्राटदार या खड्ड्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वेचे अधिकारी देखील या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेल्वे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येथील रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ वरील लोहमार्गावर अनेक प्रवाशी रेल्वे गाड्या थांबतात. प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसापासून खड्डे पडले आहते. तसेच काही फरशा या मोकळ्या झाल्या असल्यामुळे प्रवाशांचा या खड्यात पाय जावून मोडण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबधीत पूर्णा रेल्वे विभागाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ४वरील दादरा शिडीच्या पाय-या देखील फुटून लोखंडी ऐंगल बाहेर निघाले आहेत.

त्यात प्रवाशांचा पाय अडकवून मोडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसर व प्लॅटफॉर्मवर अस्वच्छता असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील वेटिंग हॉल येथे स्वच्छालयातील लाईट ब-याच महिन्यांपासून बंद असून कंत्राटदार याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास होत आहे. पूर्णा येथील संबंधित रेल्वे अधिकारी प्लॅटफॉर्मवरील असुविधांकडे लक्ष देत नसल्याने या प्रकाराकडे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी रेल्वे प्रवाशी वर्गातून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR