38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयमुस्लिम महिलांना जबरदस्तीने लावला होळीचा रंग

मुस्लिम महिलांना जबरदस्तीने लावला होळीचा रंग

बिजनौर : वृत्तसंस्था
दोन मुस्लिम महिलांना जबरदस्तीने होळीचा रंग लावण्यात आल्याचे प्रकरण समोर आलय. सोशल मीडियावर या संबंधीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहे. जबरदस्तीने रंग लावणा-या समाजकंटकांविरोधात कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. धामपूर महाराज मंदिराजवळ ही घटना घडली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश बिजनौर येथील हे धक्कादायक प्रकरण आहे. दोन मुस्लिम महिला बाईकवर बसून आपल्या परिचित व्यक्तीसोबत त्या घरी जात होत्या. त्यावेळी बाजारात काही लोक होळी खेळत होते. हे लोक मुस्लिम महिलांना रंग लावण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. त्यावेळी महिलांनी त्यांना कलर लावण्यापासून मनाई केली. पण, तरीही त्यांना जबरदस्तीने रंग लावला.

त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्या अंगावर पाणी फेकले. जोरजोरात हॅप्पी होली म्हणून ओरडू लागले. महिलांनी त्यांना सांगितले की, आम्ही बाजारात जातोय. आम्हाला रंग लावू नका.

हर-हर महादेवच्या घोषणा
व्हायरल व्हिडिओमध्ये युवकाने मोटरसायकल तिथून निघताना सुद्धा पाणी आणि रंग फेकण्यात आले. रंग लावल्यानंतर हर-हर महादेवच्या घोषणा दिल्या.

एसपी काय म्हणाले?
बिजनौरचे एसपी नीरज कुमार जादौन म्हणालेक की, ‘आम्हाला व्हिडिओबद्दल समजलय. आम्ही यावर कारवाई करु. अशा प्रकारे कोणाला त्रास देण चुकीच आहे. जबरदस्ती कलर लावणा-यांविरोधात कारवाई होईल. लोकांनी होळी खेळावी, पण शांततेने. अशा प्रकारच वर्तन सहन केले जाणार नाही’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR