38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रबोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात

बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात

गोंदिया : . गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार घडला आहे. नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडला आहे. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सरकारने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. अशातच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नव्या हॉस्पिटल चालवत असलेल्या डॉ. नीतेश बाजपेयी यांनी बोगस दवाखाना या ठिकाणी सुरू केला. यात विविध प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी येत असल्याचे त्यांनी बोर्डावर दाखविले. आणि या दवाखान्यात तो डॉक्टर म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत आहे.

आपल्या नावासमोर एमडी. डीएनबी अशी उपाधी त्याने लावली आहे, मात्र हा डॉक्टर नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक अमरीश मोहबे यांनी सांगितले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिसांनी या दवाखान्यावर धाड मारली. त्यावेळी दवाखान्यामध्ये एक महिला दीड महिन्याची गर्भवती असताना तिचा गर्भपात करण्यात आला होता. दवाखान्यातच महिला उपस्थित होती. त्यामुळे या दवाखान्यामध्ये अवैध रूपाने गर्भपात केला जात असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला.

विशेष बाब म्हणजे नितेश बाजपाईवर कोविड काळामध्ये अवैध रूपाने हॉस्पिटल उघडल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याने आपल्याकडे बीएएमएस डिग्री असल्याचे दाखवले होते. याबाबत संबंधित युनिव्हर्सिटीला विचारणा केली असता त्याची डिग्री बोगस असल्याचे वृत्त समोर आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR