38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनअभिनेता इमरान हाश्मीने साजरा केला ४५ वा वाढदिवस

अभिनेता इमरान हाश्मीने साजरा केला ४५ वा वाढदिवस

मुंबई : सिरीयल किसर बनून अभिनेता इमरान हाश्मीने बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत होता. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला गेम चेंजर म्हणून उदयास आलेल्या या अभिनेत्याने आपल्या शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. इमरान हाश्मी आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यामुळे त्याचे चाहते इमरानला सोशल मीडिया साईडवर शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, इमरान हाश्मीला अवॉर्ड शोमध्ये जाण्यास रस नाही हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि त्याने याचे कारणही सांगितले आहे.अभिनेता फंक्शनला जाण्याऐवजी त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारण्यास प्राधान्य देतो.

इमरान हाश्मी आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. एका मुलाखतीत इम्रानने सांगितले होते की तो एकदा एका पुरस्कार सोहळ्याला गेला होता पण २० मिनिटांतच बाहेर पडला. याचा खुलासा करताना, इमरान सांगतो की, प्रेक्षकांचे प्रेम माज्यासाठी महत्त्वाचे आहे आणि मला माज्या चाहत्यांकडून सतत प्रेम मिळत आहे याचा मला आनंद आहे.

ज्या तारे -तारकांना यात सहभागी व्हायचे आहे ते या साहळ्यात सहभागी होतात आणि जे या पुरस्कारास पात्र आहेत त्यांना पुरस्कारही मिळतात. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन होत असते. अशा सोहळ्यामधून उठणे आणि निघून जाणे चुकीचे आहे, परंतु मी २० मिनिटापेक्षा जास्तवेळ बसू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचा अपमान करण्याऐवजी मी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला असे इमरान हाश्मी म्हणतो.

इमरान हाश्मीचे हिट चित्रपट
इमरान हाश्मी दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये गँगस्टर, मर्डर, जन्नत, द डर्टी पिक्चर, शांघाय आणि राझ ३ या चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडे तो डिस्ने हॉटस्टारवरील ए वतन मेरे वतन आणि शोटाइम मध्ये देखील दिसला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR