मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :
– प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यंत वीज बील माफ
– राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्याला ८ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला.
– नगर विकाससाठी १० हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी १९ हजार कोटी रुपये देणार
– ७ हजार ५०० किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.
– राज्यात १८ वस्त्रोद्योग उभारले जाणार
– १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.
– वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे.
– मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येत आहे.
– रत्नागिरी भागवत बंदरसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद
– हर घर हर नल योजनेअंतर्गत १ कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट
– महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी योजना प्रस्तावित
– राज्यात सहा वंदे भारत एक्स्रेस सुरु आहेत
– मिहान प्रकल्पासाठी १० कोटींचा निधी दिला.
– नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार
– लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार
– ३४ हजार घरकुल दिव्यांगासाठी बांधली जाणआर
– राज्यात ५० पर्यटन ठिकाणची निवड करण्यात आली आहे
– लोणावळा या ठिकाणी स्काय वॉक प्रकल्प उभारला जाईल
– अयोध्या आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे
– वढू येथील स्मारकाला २७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत
– दिल्ली, गोवा आणि बेळगाव या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारले जाणार
– प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
– संजय गांधी निराधार योजनेत १००० वरुन १५०० पेन्शन दिली जाणार.
– संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन केलं जईल
– संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी ५२९ कोटी
– निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्क
– मेक इन इंडिया धोरणांतर्गत १९६ कोटी रुपये निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.न्ह्यावी मुंबईत मॉल करण्यात येणार आहे.
– शेतक-यांसाठी मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली जाणार
– कोल्हापूर व सांगलीत पूर रोखण्यासाठी २३०० कोटी रूपयांची कामे केली जाणार
– विदर्भात सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी तरतूद
– ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार े
– ३७ हजार आंगणवाडीना सौर उर्जा दिली जाणार
– ४४ लाख नुकसान झालेल्या शेतक-यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली
– १ लाख महिलांना रोजगार दिला जाईल
– सोलापूर, तुळजापूर, धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू आहे
– जालना, यवतमाळ, पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी ५० टक्के रक्कम सरकार देणार. ही चौथी मार्गिका असणार आहे
– मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे