25.5 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइमरान खान आणि बुशरा बीबी यांना भ्रष्टाचारप्रकरणी १४ वर्षांची शिक्षा

इमरान खान आणि बुशरा बीबी यांना भ्रष्टाचारप्रकरणी १४ वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेनंतर बुशरा बीबी यांनी आत्मसमर्पण केले आहे. विरोधी पक्षांनी २०२२ मध्ये इमरान खान यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी केली होती. भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ते आधीच तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. आज त्यांना भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या निर्णयानुसार इमरान खान आणि बुशरा बीबी यांना १० वर्षांपर्यंत कोणतेही सरकारी पद धारण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इमरान आणि बुशरा यांच्यावर ७८-७८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इमरान खान यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावरील बहुतांश खटले राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

इमरान खान यांना ही शिक्षा पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या काही आठवडे आधी झाली आहे. इमरान खान यांच्यावर यापूर्वीच निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. इमरान खान यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक झाल्यापासून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान त्यांची पत्नी बुशरा बीबी हिला कोठडीत ठेवण्यात आले होते. दोघांनी पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू वैयक्तिक फायद्यासाठी विकल्याचा आरोप आहे.

‘या’ प्रकरणात १० वर्षांचा तुरुंगवास
उल्लेखनीय आहे की, एक दिवसापूर्वीच म्हणजेच मंगळवारी इमरान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले. इमरान खान यांना राष्ट्रीय गुप्तचर माहिती लीक केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR