21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खान यांना जामीन मंजूर

इम्रान खान यांना जामीन मंजूर

इस्लामाबाद : सायफर प्रकरणात पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे अशी माहिती जिओ टीव्हीने दिली आहे.

८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणा-या पाकिस्तान संसदीय निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधानांचा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा तुरुंगातील खटला रद्दबातल ठरवल्यानंतर अधिकृत गुपिते कायदा २०२३ अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला पीटीआय संस्थापकाला पुन्हा सिफर प्रकरणात दोषी ठरवले होते.

तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खानचा तुरुंगातील खटला रद्दबातल ठरवल्यानंतर पीटीआयचे संस्थापक इम्रान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अधिकृत गुपिते कायदा २०२३ अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने सायफर प्रकरणात पुन्हा दोषी ठरवले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन वर्षांचा तुरुंगवास आणि १,००,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान हे पंतप्रधान म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून १४० दशलक्ष (यूएसडी ४९०,०००) पेक्षा जास्त किमतीच्या सरकारी भेटवस्तू विकल्याबद्दल दोषी आढळले होते, जे त्यांना त्यांच्या परदेश दौ-यांदरम्यान परदेशी मान्यवरांकडून मिळाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR