22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रबीडच्या १०० एकरात पुन्हा घुमणार जरांगेंचा आवाज

बीडच्या १०० एकरात पुन्हा घुमणार जरांगेंचा आवाज

बीड : मराठा आरक्षणासंदर्भात २४ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. बीडपासून साधारणत: पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणा-या सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर ही सभा होणार आहे.

सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर १०० एकर परिसरात ही सभा होणार आहे. २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मनोज जरांगे पाटील यांची ही इशारा सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

२४ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमच्या पूर्वीची ही शेवटची सभा असणार आहे. १०० एकर परिसरात होणा-या जाहीर सभेकरता बीडमधील मराठा समाजाचे कार्यकर्ते, समन्वयक तयारीला लागले आहेत. तर या दिवशी वाहतुकीचा कोणताही खोळंबा व्हायला नको, म्हणून तशी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR