25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयचीनमध्ये महिलांचे निर्बीजीकरणाचे प्रमाण वाढले

चीनमध्ये महिलांचे निर्बीजीकरणाचे प्रमाण वाढले

बीजिंग : चिनी सरकार शिनजियांगमधील उघूरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे, त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजीकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे.

त्यांचा वंशविच्छेद होत आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघूरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचारपरिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमूलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सपशेल फेटाळले असले, तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. उघूर नावाच्या मानवसमूहाच्या बाबतीतील चीनचा व्यवहार हा निंदनीय, आक्षेपार्ह आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे, असेच मुस्लीममेतर जग मानते आहे आणि मानत राहणार आहे, हे नक्की. पण, मग मुस्लीम जग अशी मुलुखावेगळी भूमिका का घेत आहे?

सिनीफिकेशन हे एका प्रक्रियेचे नाव असून यानुसार चिनी नसलेले समाज किंवा गट यांना चिनी संस्कृतीत आत्मसात करून घेणे अपेक्षित आहे. यातून असे समाज किंवा गट, भाषा, सामाजिक नियम, संस्कृती आदी बाबतीत मूळ चिनी समाजाशी एकरुप होणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांत चीनमध्ये शेकडो मशिदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. चीन हा तसा अनेक धर्मीयांचा देश. बौद्ध धर्म, ताओवादी, प्रोटेस्टंट, कॅथलिक आणि इस्लाम यांना मानणारे तर अनेक लोक चीनमध्ये राहतात. बहुसंख्य चिनी मुस्लिमांत हुई लोक आणि उघूर लोक प्रमुख आहेत. चीनमधील बहुसंख्य मुस्लीम वायव्य भागात राहतात, विशेषत: गान्सू, किंघाई, ंिनग्झिया आणि शिनजियांग या भागात त्यांची वस्ती आहे. या भूभागाचे क्षेत्रफळ १.६ चौरस अब्ज किमी किंवा ०.६४ अब्ज चौरस मैल (म्हणजे चीनमधील एकषष्ठांश भाग) आहे. संपूर्ण चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९.६ चौरस अब्ज किमी किंवा ३.७ अब्ज चौरस मैल आहे.

चीनमध्ये अडीच कोटी मुस्लीम
आज चीनमध्ये अंदाजे २५ दशलक्ष (अडीच कोटी) मुस्लीम आहेत, ज्यात हुई, उघूर, कझाक, टाटर आणि इतरांचा समावेश आहे. पण, मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर सुन्नी आहे. अंदाजे एक ते तीन दशलक्ष मुस्लीम शिया आहेत. अनेक लहान मुस्लीम गटही अस्तित्त्वात आहेत. अहमदी मुस्लिमांची एकूण संख्या दोन लक्ष ते चार लक्ष असावी, तर चीनची एकूण लोकसंख्या १४० कोटी आहे.

अरबी मशिदी जमीनदोस्त
अरबी शैलीत बांधलेली एकही मशीद आता चीनमध्ये उरलेली नाही. चीनच्या शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीमध्ये अनेक बदल करताना घुमट आणि मिनार काढण्यात आले आहेत. मशिदीच्या इमारतीचे रुपांतर अरबी शैलीतून चिनी वास्तुकलेमध्ये करण्यात आले आहे. मिनार नसलेल्या मशिदींची छायाचित्रे समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चीनच्या या कृत्याविषयी संताप व्यक्त केला. भारत किंवा अन्य देशांत असे झाले असते, तर आम्ही आकाश-पाताळ एक केले असते अशी टीका त्यांनी केली, या बाबीची विशेष नोंद घ्यावयास हवी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR