40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र‘आयात की स्थानिक’ निवडणूक रंगात

‘आयात की स्थानिक’ निवडणूक रंगात

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघ मतदारांत कोठे संभ्रम कोठे उत्साहची स्थिती

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आयात आणि स्थानिक या विषयावरुन निवडणुक रंगणार आहे. त्यात शिवसेना नेत्या भावना गवळी यांना डच्चु दिल्याने शिवसैनिक नेमके कोणत्या शिवसैनिक उमेदवाराचे काम करतात हे पाहण्यासारखे असेल. आठवड्याभरापूर्वी उमेदवारी न मिळाल्याने दोघात लढत असली तरी आयात आणि स्थानिक या मुद्यावर ही निवडणुक चर्चित राहील. दोन्ही कोट्यधीश उमेदवार ही निवडणूक जिंकण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहण्यासारखे असेल. महायुती विरोधात महाविकास अशी थेट लढत या मतदार संघात आहे. पाच वेळा भावना गवळी खासदार होत्या त्या कोणाचा प्रचार करतात का हे पाहण्यासारखे ठरेल. वंचित उमेदवारांचे नामांकन रद्द करणे हे मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप वंचितने केला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात अजूनही २० उमेदवार आहेत. असे असले तरी मुख्य सामना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच रंगणार आहे. आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय व आमदाराचे निवृत्तिवेतन आहे. युतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय व मानधन असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १८ नामांकन बाद झाले. निवडणुकीच्या रिंगणात अजूनही २० उमेदवार आहेत. त्यापैकी महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार करोडपती असल्याचे शपथपत्रात दिसतात.

प्रचारातील प्रभावी ठरणारे मुद्दे
– कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलांची रोजगार उद्योगाचा अभाव.
– सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचा-यांचा अभाव.
– वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास
– यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना.

देशमुख यांची जमेची बाजू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्वगृही परतलेल्या माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले. त्यांनी १० वर्ष दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचे विधानसभेमध्ये नेतृत्व केले. अपक्ष आमदार असतानाही मंत्रिपद मिळवण्याची किमया त्यांनी साधली होती. २००२ ते २००४ या काळात ते राज्यमंत्री होते.

वंचितने केली चौकशीची मागणी
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे मोठे षडयंत्र आहे. अभिजित राठोड यांच्या अर्जात असलेल्या त्रुटी करीता छाननी आधी दिलेल्या नोटीस प्रमाणे अभिजित राठोड यांनी नव्याने प्रतिज्ञा लेख तयार करून सादर करून त्यांना दिलेले त्रुटी पूर्ण केल्या नंतर नव्याने त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया यांनी वंचित उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. विशेष म्हणजे त्रुटी पूर्ण झाल्या वर देखील ऐन वेळी छाननी मध्ये नव्याने त्रुटी काढून जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR