38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून भुजबळ यांची माघार

नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून भुजबळ यांची माघार

महायुतीच्या वादात भुजबळांची घोषणा

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अजून तिढा कायम असून एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ देखील या जागेसाठी आग्रही होते. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचं निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आज आम्ही ६ वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली तिथ जागा वाटप बाबत चर्चा झाली. छगन भुजबळ यांना उभे करा असे थेट अमित शाह यांनी सांगितले. त्यावेळी एकनाथ शिंदे, अमित शाह यांना म्हणाले तिथे हेमंत गोडसे आमचे उमेदवार आहेत. परंतु अमित शाह म्हणाले आम्ही त्यांना समजावू. आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगले असल्याचे लक्षात आले. अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारी बाबत माध्यमातुन बातमी बाहेर आली. हे सूरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला ते म्हणाले अमित शाह यांनी तुम्हाला लढावे लागेल असे सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सेम बोलले. त्यानंतर ३ आठवडे गेले मात्र अजुनही उमेदवार जाहीर झालेले नाही.

महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील ३ आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढे गेले आहे. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी प्रेस घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला आतापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार आहे. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR