33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeउद्योगभारतात ‘AI’ संबंधित नोकरदारांची चांदी होणार!

भारतात ‘AI’ संबंधित नोकरदारांची चांदी होणार!

नवी दिल्ली : भारतात ‘एआय’शी संबंधित क्षेत्रात काम करीत असलेल्या नोकरदारांची विलक्षण चांदी होणार अर्थातच त्यांना अमाप पगार मिळणार असल्याचे संकेत अमेझॉनची उपकंपनी असलेल्या अमेझॉन वर्क स्टेशन (AWS)च्या अहवालात देण्यात आले आहेत.

अमेझॉन वर्क स्टेशनने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील ‘AI’ कौशल्ये आणि ज्ञान असलेल्या कर्मचा-यांना ५४ टक्क्यांहून अधिक पगार वाढ मिळू शकते.

अमेझॉनची उपकंपनी ‘एडब्ल्यूएस’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, जवळपास ९९ टक्के कंपन्या २०२८ पर्यंत त्यांचे ब-यापैकी काम ‘एआय’ प्रणालीवर शिफ्ट करण्याच्या योजना आखत आहेत.

अहवालात म्हटले आहे की, ९७ टक्के कंपन्यांना विश्वास आहे की, त्यांच्या वित्त विभागाला याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. त्यानंतर आयटी (९६ टक्के), संशोधन आणि विकास (९६ टक्के), विक्री आणि विपणन (९६ टक्के), व्यवसाय ऑपरेशन्स (९५ टक्के) मानव संसाधन (९४ टक्के), आणि कायदेशीर विभाग (९२ टक्के) यांना ‘एआय’ संबंधित कौशल्य निपुणतेचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

जवळपास ९८ टक्के कंपन्या पुढील पाच वर्षात नोकरीवर जनरेटिव्ह ‘एआय’टूल्स वापरण्याची तयारी करत आहेत. भारतातील १,६०० कामगार आणि ५०० ​कंपन्या यांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अमेझॉन वर्क स्टेशनचे एक्झिक्युटिव्ह अमित मेहता म्हणाले की, त्यांच्या कंपनीने विप्रो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, आयरिस सॉफ्टवेअर आणि इतर सारख्या आयटी प्रमुख कंपन्यांतील कर्मचा-यांना ‘एआय’ कुशल कामगार बनवण्यासाठी करार केला आहे.

एआय इंडस्ट्रीमध्ये नोक-या शोधत असलेल्या लोकांसाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे एआय-कुशल कर्मचा-याची नियुक्ती करणे ही भारतातील दहापैकी नऊ पेक्षा जास्त (९६ टक्के) कंपन्याचे प्राधान्य आहे, असे ‘एडब्ल्यूएस’च्या अहवालात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR