21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावात वाढलेली ४.४१ टक्के मते कुणाच्या फायद्याची?

जळगावात वाढलेली ४.४१ टक्के मते कुणाच्या फायद्याची?

जळगाव : जळगाव लोकसभा निवडणूकीची विजयाचे गणित जळगाव शहराच्या मतावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी युतीचे उमेदवार उन्मेश पाटील यांना शहरातून मिळालेला ७१ हजार ७१३ मताधिक्यावरच भाजपची मोठी भिस्त आहे.

तर महाविकास आघाडीचे यावेळी झालेले नवीन समीकरण तसेच मुस्लीम मतदारांची मिळालेली भक्कम साथ यावर त्यांना विजयाची आशा आहे. त्यामुळे शहराच्या मतदानात वाढलेली ४.४१ टक्के मते कुणाला फायदा व कुणाला धक्का देणार याकडेच आता लक्ष आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरात यावेळी एकूण ५३.५५ टक्के मतदान झाले आहे.

गेल्यावेळी सन २०१९ मध्ये ४९.१४ टक्के मतदान झाले होते. शहरात यावेळी एकूण ३ लाख ८६ हजार ७३४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख १४ हजार ५४८ मतदान झाले आहे. यात १ लाख १७ हजार ४२९ पुरूष व ८७ हजार ११६ महिलांनी तर ३ तृतीय पंथीयांनी मतदान केले आहे. यावेळी मतदानाचा टक्का हा ४.१९ ने वाढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR