मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी जोरदार प्रचार केला जात आहे. निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मतदान होऊ नये, याची संपूर्ण काळजी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांकडून घेतली जात आहे. मात्र, काही ठिकाणी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होत असल्याचे चित्र आहे. मुंबईच्या धारावीत कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे तणाव वाढला होता. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे अनर्थ टळला.