28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeसोलापूरपवारांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर : सोलापुरातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे यांना जोरदार धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बिज्जू प्रधानेसह माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर या प्रमुख नेत्यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मागील वर्षीच बिज्जू प्रधानेसह इतर मान्यवरांनी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्ष सोडून महेश कोठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. हे प्रवेश म्हणजे महेश कोठे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. शनिवारी जुनी मिल कम्पोंडच्या मैदानावर झालेल्या शहराच्या मेळाव्यात त्यांनी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजयमामा शिंदे, किसन जाधव, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR