22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीययंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांचा कल कुणाकडे?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांचा कल कुणाकडे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वांत जास्त मुस्लिम आणि अल्पसंख्याक या दोन शब्दांचा जास्त उल्लेख ऐकायला मिळाला. त्याची सुरुवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिलला राजस्थानमध्ये केलेल्या भाषणातून. मोदींनी त्या भाषणात अल्पसंख्याकांबाबत भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले. ४ जून रोजी निकाल लागणार असून केंद्रात कुणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वांत जास्त मुस्लिम आणि अल्पसंख्याक या दोन शब्दांचा उल्लेख ऐकायला मिळाला. त्याची सुरुवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिलला राजस्थानमध्ये केलेल्या भाषणातून. मोदींनी त्या भाषणात अल्पसंख्याकांबाबत भाष्य केले होते. आणि याच मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. एकीकडे काँग्रेसने पंतप्रधानांवर त्यांच्या जाहीरनाम्याबाबत संभ्रम पसरवल्याचा आरोप केला.

मात्र, नंतर पंतप्रधान म्हणाले की मी हिंदू-मुस्लिम राजकारण करत नाही. आणि याचे परिमाण देशभरात पाहायला मिळाले. त्यामुळे मुस्लिम समाजाने कुणाला कौल दिला आहे हे ४ जून रोजीच कळेल. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ८६ जागांवर अल्पसंख्याकांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. आणि या जागा उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहेत.
‘इंडिया’ आघाडीला मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा
लोकनीती प्रोग्राम फॉर कंपेरेटिव्ह डेमॉक्रसीने सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार, अल्पसंख्याकांची चांगली लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के मुस्लिमांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मतदान केले. तर उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मुस्लिमांनी तर बिहार विधानसभा निवडणुकीत ७७ टक्के मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले.

इंडिया आघाडीकडून ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात
यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने एकूण ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत, तर गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ११५ इतकी होती. त्यापैकी २६ जागा निवडून आल्या होत्या.

बसपाने मुस्लिम उमेदवारांना दिली सर्वाधिक तिकिटे
मुस्लिम समाजातील तिकिट वाटपावर जर आपण नजर टाकली तर बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक ३५ उमेदवार उभे केले आहेत. यानंतर काँग्रेस १९ उमेदवारांसह दुस-या क्रमांकावर आहे. तर तृणमूल काँग्रेस तिस-या क्रमांकावर आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने उत्तर प्रदेशमध्ये ९९ मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिले होते. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली होती.

भाजपसाठी अडचण निर्माण होणार
प. बंगालमधील राजकीय विश्लेषक जयंत घोषाल यांनी मुस्लिम समाजाच्या मतांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सध्या ३० टक्के मुस्लिम व्होट बँक काँग्रेस, सीपीएम आणि मुस्लिम सेक्युलर फ्रंट या पक्षांमध्ये विखुरलेली आहे. टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने सीएएच्या मुद्यावर भाजपविरोधात प्रचार करत आहेत, त्यानुसार जर हा समुदाय तृणमूलच्या बाजूने गेला तर भाजपला अडचणी येऊ शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR