22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयउत्तराखंड, दिल्ली, चंदीगडमध्ये १२ ठिकाणी ‘ईडी’ची धाड

उत्तराखंड, दिल्ली, चंदीगडमध्ये १२ ठिकाणी ‘ईडी’ची धाड

रांची : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी माजी मंत्री आणि उत्तराखंडचे काँग्रेस नेते हरकसिंग रावत यांच्या डेहराडून येथील घरावर छापा टाकला. तपास यंत्रणेने रावत यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि चंदीगडमधील १२ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.

वनजमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रावत यांच्या मंत्रिपदाच्या काळात कॉर्बेट पार्कच्या पाखरोन रेंजमधील टायगर सफारी प्रकल्पासाठी १६९ झाडांऐवजी ६ हजार झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली होती. याशिवाय पाखरोन रेंजमध्येही बेकायदा बांधकामे झाली होती.

या प्रकरणात रावत आणि तत्कालीन काही अधिकारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याप्रकरणी ईडी आज छापे टाकत आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये दक्षता विभागाने रावत यांच्यावर कारवाईही केली होती.

रावत हे २०१९-२० मध्ये भाजप सरकारमध्ये वनमंत्री होते. अनुशासनहीनतेच्या आरोपावरून भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि कॅबिनेट मंत्रिपदावरून बडतर्फ केले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रावत यांच्यासोबत त्यांची सून अनुकृती गुसाई यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR